

Alaknanda Co-operative Housing Society
About Alaknanda
Kothrud is a suburb west of Pune city. Kothrud had a well-planned development in the 1980s and 1990s. Around that time many small societies and apartments sprang up. Shivananda Gardens was one of the first major projects started here. The Alaknanda Co-operative Housing Society is one of the most important societies in the Shivananda Gardens project in the heart of Kothrud. Alaknanda has a total of eight wings, of which four wings are four storeys and four wings are six storeys. In addition, three-row houses have been included in the society. There are 144 residential flats, 24 shops and 3 row houses with a total of 171 members.
This is the thirtieth year of this society. The Alaknanda Society is one of the few active societies in the area. For the last 26 years, Sarvajanik Ganeshotsav has been celebrated with enthusiasm. Under this, children's cultural programs are organized in society. Also, arts and sports competitions are held. Meals are organized for the members and their families. On the occasion of Diwali, Diwali-Pahat or a one-day Picnic for members and families gets organised. National Festivals – Independence Day (August 15) and Republic Day (January 26) is celebrated in the Society by raising the flag.
The premises of the society are kept green and eco-friendly practices are followed in maintenance. Projects like drip irrigation, wet waste composting in the premises of the society as well as rainwater harvesting are carried out in the society. The members of the society have a playful atmosphere and many are ready to help in the development of society.
This society is happily ready for the redevelopment process as it is completing 30 years.
पुणे शहराच्या पश्चिमेस असलेले कोथरूड हे उपनगर. १९८० आणि ९० च्या दशकांमध्ये कोथरूडचा सुनियोजित विकास झाला. त्या सुमारास बऱ्याच छोट्या सोसायट्या आणि अपार्टमेंट्स उभी राहिली. सुरुवातीचे जे मोठे प्रकल्प इथे सुरु झाले त्यामध्ये शिवानंद गार्डन्स हा प्रकल्प होता. कोथरूडच्या मध्यभागामध्ये मूळ गावठाणाशेजारी असलेल्या या शिवानंद गार्डन्स प्रकल्पामध्ये ज्या सोसायट्या येतात त्यापैकी सर्वात महत्वाची सोसायटी म्हणजे "अलकनंदा को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी". अलकनंदामध्ये एकूण आठ विंग्ज असून त्यापैकी चार विंग्ज चार मजली तर चार विंग्ज सहा मजली आहेत. त्याबरोबरच तीन रो हाऊसेसचाही सोसायटीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. इथे रहिवासी फ्लॅट्सची संख्या १४४ असून २४ दुकाने आणि ३ रो हाउसेस अशी एकूण १७१ सभासदांची ही सोसायटी आहे.
यंदा या सोसायटीचे तिसावें वर्ष सुरु आहे. या भागामध्ये ज्या काही ऍक्टिव्ह सोसायट्या आहेत त्यामध्ये अलकनंदा सोसायटी गणली जाते. गेली २६ वर्षे येथे सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहाने साजरा केला जातो. त्याअंतर्गत सोसायटीमधील मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. तसेच कला आणि क्रीडास्पर्धा घेतल्या जातात. सभासद आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी सहभोजन आयोजित केले जाते. दिवाळीनिमित्ताने दिवाळी-पहाट अथवा सभासद आणि कुटुंबियांच्या एक दिवसीय सहलीचे नियोजन केले जाते. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी हे राष्ट्रीय सण सोसायटीमध्ये ध्वजउभारणी करून साजरे केले जातात यामध्ये लहान थोरांचा सहभाग असतो. सोसायटीचा परिसर हिरवागार ठेवलेला असून पर्यावरणस्नेही पद्धतींचा अवलंब मेंटेनेन्समध्ये केला जातो. ठिबक सिंचन, ओला कचरा सोसायटीच्या आवारातच जिरवून त्याचे खतामध्ये रूपांतरण करणे तसेच रेनवॉटर हार्वेस्टिंग सारखे प्रकल्प सोसायटीमध्ये चालवले जातात. सोसायटीमधील सभासदांमध्ये खेळीमेळीचे वातावरण असून सोसायटीच्या विकासासाठी मदतीस अनेकजण तत्पर असतात.
अशी ही हसती-खेळती-नांदती सोसायटी तीस वर्षे पूर्ण होत असल्याने पुनर्विकास प्रक्रियेसाठी सुसज्ज झाली आहे.
Members Of Redevelopment Committee
Mr. Umesh Nilkanth
Secretary
Mr.Ashok Shelar
Chairman
Mr. Avinash Kanitkar
Mr. Ajay Deshmukh
Mr. Avinash Menvalikar
Mr. Milind Joshi
Mr. Vikram Pandit
Mrs. Bharati Dandekar
Mrs. Amruta Pandit
Mr. Chandrakant Jagtap
Mrs. Neelima Karandikar
Mrs. Shruti Inamati
Mrs. Poorva Kulkarni
Mr. Pankaj Sutrave
Mr. Satish Purohit
Mr. Ganesh Saruk
Mr. Abhijit Pathak
Mr. Satish Girme
Mr. Devendra Joshi
Sign Up to Get Updates...
Stay up-to-date with the latest news